भाग्य हा एक बहुचर्चित आणि चित्तवेधक विषय आहे. परंतु याबाबत फारच कमी ज्ञात आहे. ‘भाग्य’ हा शब्द, त्याची कार्यप्रणाली तसंच जीवनावर पडणारा त्याचा प्रभाव यासंदर्भात अगणित प्रश्न उभे राहतात. परंतु वास्तवत: भाग्य आहे काय? खरंच वास्तवात भाग्याचं काही अस्तित्व आहे का? खरंच भाग्य लिहून ठेवलेलं आहे का? भाग्य म्हणजे निव्वळ संयोग की निवड? आपण भाग्याची प्रतीक्षा केली पाहिजे की त्याच्या मागे धावलं पाहिजे? अशाच कित्येक प्रश्नांची उत्तरं ख्यातनाम लेखक आणि वक्ता दीप त्रिवेदी लिखित ‘भाग्याची रहस्यं’ या पुस्तकात सापडतील. या पुस्तकात दीप त्रिवेदी भाग्याच्या रहस्यांवरचा तसंच आपलं अस्तित्व चालवणार्या भाग्याच्या नियमांवरचा पडदा तर दूर करतातच, खेरीज ते आपल्याला आपलं भाग्य स्वत: रचण्याची कलाही शिकवतात.
जर का यशाची शिखरं गाठणं तसंच आनंद आणि मजेत जगणं हा तुमच्या जीवनाचा उद्देश आहे, परंतु तुम्हाला त्याकरिता उचित मार्ग दिसत नसेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे.
Reviews
There are no reviews yet.