तुम्ही काही महत्त्वाचे काम करण्यासाठी टेबलाशी बसला आहात. पण तुमच्या फोनवर काही संदेश येतो आणि तुमच्या सकाळच्या वेळेत व्यत्यय येतो. तुम्ही पुन्हा तुमचे काम सुरु करणार तेवढ्यात कुणी सहकारी तुमच्या पाठीवर थाप मारत तुमच्याशी गप्पा मारू लागतो. घरी, तुम्हाला कुटुंबाबरोबर जो वेळ घालवायचा आहे, त्या वेळेत तुमचा स्क्रीनवर घालवलेला वेळ अडथळा आणतो. आणखी एक दिवस संपतो आणि पुन्हा एकदा तुमची व्यावसायिक आणि वैयक्तिक कामे रेंगाळतात. जर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे काम केले तर काय होईल? जर तुम्ही तुमची एकाग्रता टिकवू शकलात तर तुम्ही काय साध्य करू शकाल ? जर तुमच्याकडे ‘अविचलित’ राहण्याची शक्ती असेल तर काय होईल? आपल्याला विचलित करणाऱ्या सुप्त मानसिकतेकडे एयाल या पुस्तकात लक्ष वेधतो. उपकरणे बाजूला ठेवून देण्याइतका हा प्रश्न सोपा का नाही याचे विश्लेषण तो करतो. एखाद्या गोष्टीचा त्याग करणे किंवा मनावर ताबा ठेवणे हे कित्येकदा अव्यवहार्य असते कारण त्यामुळे आपल्याला तीच गोष्ट अधिक हवीशी वाटते. तुम्ही जे करायचे ठरवले आहे ते तुम्ही कसे साध्य करू शकता यामागचे रहस्य एयालने संशोधनाने सिद्ध केलेल्या चार पायऱ्यांच्या नमुन्याद्वारे दाखवून दिले आहे. तंत्रज्ञानाच्या आहारी न जाताही आपण तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग कसा करून घेऊ शकतो हे प्रस्तुत पुस्तक दाखवून देते.
Marathi books
Indistractable (Marathi) | इन डिस्ट्रॅक्टेबल Paperback – 9 June 2023 by Nir Eyal (Author)
Original price was: ₹299.00.₹240.00Current price is: ₹240.00.
- Publisher : Goel Prakashan (9 June 2023)
- Paperback : 216 pages
- ISBN-10 : 9393624216
- ISBN-13 : 978-9393624215
Reviews
There are no reviews yet.